मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यावश्यक सेवासुविधांमधील सर्वच कर्मचारी काम करुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
तसेच कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यात येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनतेने पुढे येत रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्ताची टंचाई भासत आहे. अवघे पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा रुग्णालयांत असून रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन ठाकरे यांनी आज केले.
रक्तपेढय़ा तसेच रुग्णालयांत मोठय़ा प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. परंतु रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे जनतेला आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’


