Share

देशातील घुसखोरांना २०२४च्या आधी हुसकावून लावूच. – अमित शहा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ” परकीय घुसखोरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. अशा घुसखोरांचा शरद पवार, राहुल गांधी या नेत्यांना त्यांचा पुळका आला आला असला तरी त्यांना कितीही ओरडू द्या, या घुसखोरांना २०२४च्या आधी हुसकावून लावूच. अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी धारणी येथील प्रचारसभेत बोलताना केली.

धारणीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शहा यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ते म्हणाले, ” महाराष्ट्रातील जनतेचे कश्मीरमधील ३७०व्या कलमाशी काय घेणे-देणे आहे, असा प्रश्न शरद पवार विचारतात. पण ते हे विसरतात की काश्मीरसाठी मेळघाटच नव्हे, तर संपूर्ण देशातील जनता बलिदान देण्यासाठी तयार आहे. आमच्यासाठी निवडणूक नाही, तर देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. पूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानकडून हल्ले केले जात होते, पण ‘मौनीबाबा’चे तोंड उघडत नव्हते. असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला. तर आमच्या सैनिकांचे गळे कापून नेले जात होते, पण त्याला प्रत्युत्तर दिले जात नव्हते. देशाला पहिल्यांदा ५६ इंच छातीचा पंतप्रधान मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाकिस्तानला त्यांच्या घरात शिरून धडा शिकवला. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षांत केले नाही ते मोदींनी फक्त पाच वर्षांत केले. आता तुम्हीच दोघांच्या कारकिर्दीची तुलना करा. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तमरीत्या सरकार चालवत आहेत, म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या, असे आवाहनही शहा यांनी यावेळी बोलताना केले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1183000908457598976?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183008771821330434?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!