औरंगाबाद : पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात रविवारी पकडण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यू विषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच स्थानिक वृत्तपत्रात या विषयी वृत्त देखील देण्यात आले होते. या सर्वांची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी न्या. रवींद्र घुगे यांनी वनविभाग व मनपा प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनांचे पालन न केल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा दावा काही पर्यावरण प्रेमींनी केला होता. गौताळा अभयारण्यात नेत्यांना या बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूचे कारण देतांना वन विभागाकडून सांगण्यात आलं होत कि उपाशी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे म्हंटले होते. मात्र वैद्यकीय अहवालात हृदय बंद पडल्यामुळे मृत्यू झाल्याचेच स्पष्ट झाले.
आवश्यकता नसतांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले दरम्यान दम कोंडल्याने वन्यजीवप्रेमी डॉ किशोर पाठक व विदर्भातील दिशा फाउंडेशनंचे यादव तरटे यांनी केला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

