परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी सेनेच्या वतीने गुरुवारी छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक करण्यात आला. त्या निमित्त परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. सध्या जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. त्यात हे नेते एकत्र आल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार विजयराव गव्हाणे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, जिल्हा परिषद सभापती रामभाऊ घाडगे, डॉ. राजू सुरवसे, अरुण मराठे, के. पी. कणके, सुभाष जावळे, एस. एच. हाश्मी, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, गणेशराव घाडगे, नगरसेवक रितेश जैन, बाळासाहेब फुलारी, सादिक अली इनामदार आदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांना दूध, दही, साखर, तूप, मध आधी पंचामृताने दुग्धाभिषेक करण्यात आला.
त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा उपाध्यक्ष ओम लड्डा आदी उपस्थिती हाेती.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होण्याची शक्यता !
- ‘ज्यांचे नगरसेवक मोजायला हाताची बोटं पुरेशी आहेत, अशांनी महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करणे हास्यास्पद’
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

