Share

करोनाच्या काळात तुळजापुरात सक्रिय आहे ‘महिला लुटारुंची टोळी’; वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर : शासनातर्फे मोफत रेशन मिळुन सुद्धा शहरातील झोपडपट्टी भागातील काही महिला या बेघर ,परप्रांतीय, कामगार आणि ड्युटीवर असणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेल्या अन्नछत्र व अन्नधान्य किट वाटप करायच्या ठिकाणी जाऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता गरीबीच्या नावाखाली अन्न पाकिट व किट यावर डल्ला मारीत असल्याने ख-या  गरजवंताना मदत मिळत नसल्याचे उघड झाले आहे,त्यामुळे अशा बोगस मंडळी वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर शहरात झोपडपट्टीतील लोकांना शासनाकडून तीन महिने पुरेल एवढे रेशन वाटप  झाले आहे.त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना आणि दानशूर मंडळी यांच्यामार्फत घरो – घरी जाऊन मदत सुद्धा पोहोचवली आहे. पण तरीही शहरातील झोपडपट्टीतील काही महिला आम्हाला काही खायला नाही असे सांगुन तहसिलदारांकडे जाऊन अन्न – धान्याची किट मागणी करीत होत्या. यावेळी ज्यांच्या कडे रेशन कार्ड आहे, त्यांना किट मिळणार नाही असे तहसीलदारांकडून सांगितल्यावर ही मंडळी तेथुन थेट गोरगरीब, परप्रांतीय, मानसिक रुग्नांसाठी चालु असलेल्या मोफत अन्नछत्रात पोहोचवली.आणि त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता पन्नास जणींच्या घोळक्याने जावुन अन्नाची पाकिटे मागितली, यामुळे ख-या गरजवंताना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे.या महिलांचे हे टोळके संचारबंदीचा अजिबात सुद्धा विचार न करता शहरातुन एकत्रित मदत वाटप ठिकाणी  फिरत आहे.

विशेष म्हणजे यांना मोफत रेशन सोबत त्यांच्या जनधन खात्यावर पैसे सुद्धा मिळाले आहेत.पण तरीही परिस्थितीचे अजिबात गांभीर्य न बाळगता निव्वळ फुकट मिळते ते घेण्यासाठी शहरभर फिरत आहेत.यामुळे जे खरे गरजवंत आहेत. ते मात्र या मदतीपासुन वंचित राहत आहेत. तरी दुसऱ्याची मदत लाटणा-या अशा महिलांवर कारवाई करुन त्यांचा बंदोबस्त करुन खऱ्या गरजवंताना मदत पोचवा अशी मागणी होते आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!