🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. दौऱ्यापूर्वी खेळाडू आपल्या घरी वेळ घालवत आहेत. त्यासोबतच खेळाडू आपली आवड देखील जपताना दिसत आहेत.
Professor first look from Trophy Heist. Releasing June 18 pic.twitter.com/hDksy9pdrE
— Rishabh Srivastava (@AskRishabh) May 24, 2021
नुकताच विराट कोहलीचा न्यू लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत विराट कोहली फक्त शॉर्ट हेअरकट आणि दाढीमध्ये दिसला होता, पण अलीकडेच त्याचा नवा लुक व्हायरल झाला असून त्याचे लांब केस आणि लांब दाढी दिसत आहे. सध्या कोहलीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हयरल होत आहे. त्याच्या या लूकवरती सध्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

