🕒 1 min read
नवी दिल्ली- जगभरात कोरोनाने थैमान घाताले आहे.जगातील अनेक देश या विषाणूच्या अजूनही विळख्यात आहेत.असे असले तरीही बऱ्याच ठिकाणी लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. यातच उत्तर कोरियात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या आरोपीला हुकुमशहा किम जोंगने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
कोरियामध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी कडक नियम लादले आहेत. नियम मोडल्यास तिथे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. असच एक उदाहरण आता समोर आले आहे. किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान,देशात पाळण्यात येणाऱ्या कठोर नियमामुळे उत्तर कोरियात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून उत्तर कोरियाने सर्व सीमा सील केल्या आहेत. मात्र ‘त्या’ ५० वर्षीय व्यक्तीने कोरोना नियम तोडत चीनहून उत्तर कोरियात काही वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याला अटक केली.
या आरोपीच्या कृत्याने किम जोंग उनला भयंकर राग आला आणि त्याने त्याने आरोपीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर फायरिंग स्कॉडने 28 नोव्हेंबरला या आदेशाची अंमलबाजावणी केली.इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला करोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- गडकरींचा धडाका : 4127 कोटी रुपयांच्या 14 महामार्ग प्रकल्पांची केली पायाभरणी
- #Corona : देशात गेल्या 24 तासांत 512 रुग्णांचा मृत्यू ;सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- कृषी कायद्यांविरोधात काही लोक राजकीय हेतूनं गैरसमज पसरवत आहेत : खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

