🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजपसह सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. भाजपने बऱ्याच इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापले आहे. यावरून उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी उमेदवारीविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानी परिवाराने भाजपची मदत केल्यामुळे शहरात भाजपची सत्ता आली. त्यावेळी आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही मदत केली. मात्र आमदारकी तुम्हालाच देऊ, असं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार विद्यमान महापौर पंचम ओमी कलानी यांचं नाव निश्चितही झालं होतं. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं आमच्यावर अन्याय झाला आहे असं कलानी म्हणाले आहेत.
दरम्यान ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असून यंदा सुनेला किंवा मुलाला भाजपकडून तिकीट मिळण्याचा विश्वास असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. परंतु भाजपनं दगा दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतल्याचं ज्योती कलानी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182588972431626240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182588054705340416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

