🕒 1 min read
औरंगाबाद : शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निरशाजणक आणि हाताश पुर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षावर ईडीची चौकशी चालू आहे. त्यांना पराभव दिसत असल्यामूळे अशी टिका केली असल्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष जे.पी. नड्डा शनिवारी केली.
महायुतीचे फुलंब्री मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारसाठी शनिवारी सिडको एन-2 येथील विठ्ठलनगरात जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नामदेवराव गाडेकर, एकनाथ जाधव, अुनराधा चव्हाण, सुहास सिरसाट, एकनाथ जाधव, ज्ञानोबा मुंडे, बन्सीलाल गांगवे, राधाकिसन पठाडे, राम शेळके, बाबासाहेब डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविका भगवान घडमोडे होते.
जे.पी नड्डा म्हणाले, जेल आणि ईडीच्या चकरा मारणारे लोक राज्याला प्रगतीकडे नेऊ शकत नाही.यासह शरद पवारांवरही टिकास्त्र सोडले.
ही निवडणुक केवळ सरकार स्थापनेसाठी बनवित नसून ती महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचा उद्देशाने लढवत आहोत. कॉंग्रेसच्या सरकार मध्ये फक्त एका मुख्यमंत्र्याने पाच वर्षे सत्तेवर होता. त्यानंतर एक ते दोन वर्षांला मुख्यमंत्री बदलला जात होता. कॉंग्रेस मध्ये संगीत खुर्ची खेळ खेळला गेला.
यात भाजपच्या सरकारच्या देवेंद्र फडणवीस पाच वर्षे पुर्ण केली. तुमच्या मतात खुप ताकत आहे. त्यांनी केंद्रात भाजपला 303 खासदार दिले. त्याच जोरावर मोदीने 370 कलम रद्द करून देशात एक निशान, एक संविधान आणले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे युके मध्ये कलम 370 बद्दल बोलतात. याच कॉंग्रेस काश्मिर मधील तीन घरांनी जन्मू काश्मिर मध्ये मजा केली. तेथील आदिवासींना आरक्षण मिळू दिले नाही. एवढे नव्हे तर डॉ.बाबाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देत त्यांचा दोन वेळा पराभवही केला. असे सांगत कॉंग्रेसवर जोरदार टिका केली. डीएमआयसीमूळे मोठा विकास या भागाचा होईल. असे सांगितले.
राष्ट्रवादीने वेगवेगळे पक्ष फोडून पक्ष तयार केले- दानवे
कॉंग्रेस व राष्ट्रवादी मध्ये असवस्थना निर्माण झाली आहे. पक्ष सोडून भाजप मध्ये येणाऱ्यांची लाईन लागली आहे. त्यांचे नेतृत्व काय सांगत भाजप आमच्या कार्यकर्त्यांना ईडीचा धाक दाखवतय. राष्ट्रवादीने साऱ्या पक्षातून फोडफाड करून तयार केलेला हा पक्ष आहे. तुम्ही कोणाचा धाक दाखवून पक्षांतर केलं. याचं उत्तर पहिलं दिली पाहीजेत. तुम्ही दुसरे पक्ष फोडतात. असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीला लगावला.
केलं नाही तर भिती कोणाची. ईडी काय कोणतीही नोटिस दिली. तर त्याला तोंड दिली पाहीजेत. आम्ही या गुन्ह्यात अडकलो नाही. ते परंतु नोटिस येताच घाबरून जाणं भाजपवर आरोप करणं हा कंपवुतपणा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आहे. कॉंग्रेस हे डुबते जहाज आहे. त्यात कोणीच थांबायला तयार नाही. त्यांचा नेता निवडणुका असताना परदेशात आहे. त्यांच्या उमदेवाराच्या प्रचाराला कोणी येईना.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183289378723876864?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183291929536032769?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

