🕒 1 min read
औरंगाबादः काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने महाराष्ट्राला नेहमीच अस्थिर ठेवले, पण फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याला स्थिर सरकार मिळाले असे सांगत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मजबुत सरकार निवडूण द्या असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अंबड येथील जाहिर सभेते केले.
भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबड येथे जे. पी. नड्डा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना नड्डा म्हणाले, तुम्ही नारायण कुचे यांना दुसऱ्यांदा निवडूण देण्यासाठी इच्छूक आहात. या आधी तुम्ही योग्य बटन दाबले आणि रावसाहेब दानवे यांना प्रचंड मतांनी विजयी केले.
दानवेंनी संसंदेत योग्य बटन दाबले आणि मोदीजींनी कश्मिरातून 370 हटवले. मजबूत आणि स्थिर सरकार निवडूण दिल्याचा हा परिणाम आहे. मोदींची इच्छाशक्ती आणि अमित शहा यांची रणनिती यातून हे घडले. महाराष्ट्रात देखील गेल्यावेळी तुम्ही स्थिर सरकार निवडूण दिले. देवेंद्र फडणवीस यांनी आपला कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण केला.
यावेळी तुम्हाला पुन्हा एकदा राज्यात स्थिर सरकार निवडूण द्यायचे आहे, कारण मुंबईतील सरकार स्थिर नसेल तर त्याचा परिणाम फक्त राज्यावर नाही, तर दिल्लीत देखील होत असतो. महाराष्ट्राचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असल्याने मतदारांनी मजबुत सरकार पुन्हा एकदा निवडूण द्यावे असे आवाहन देखील जे.पी. नड्डा यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183293895825743874?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183291929536032769?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

