Share

Jitendra Awhad | जामीनानंतर आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सगळं ठरलेलं…”

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे सेशन कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळालाय. जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा (Case Regester Against Jitendra Awhad) दाखल केला होता. रिदा रशिद असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जवावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.

ते म्हणाले, “मला अजिबात आनंद झालेला नाही. ३५४ चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर ती भगिनी समोरुन चालत येताना दिसत आहे. तिच्या मनात हे सगळं ठरलेलं असावं. कारण मी तिला बाजूला केलं नसतं तर ती माझ्या अंगावर पडली असती. नंतर माझ्यावर एक मोठा गुन्हा दाखल झाला असता.”

“पण मला देवाने बुद्धी दिली आणि मी तिला बाजूला केलं. मला अडकवण्यासाठी हे सगळं रचलं होतं. पण देवाने मला वाचवलं,” असं आव्हाड म्हणाले आहेत. उद्धाटनाप्रसंगी एखाद्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी हात लावला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!