Share

चित्रपट एका दिवसात १०० कोटी कमवतात, मग देशात मंदी कसली; केंद्रीय मंत्र्याचे विधान 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. खासकरून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आहे आहे. सरकार यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आर्थिक मंदीवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी भाष्य केले आहे.

रविशंकर प्रसाद यांनी आर्थिक मंदीवर भाष्य करताना ‘२ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे.

पुढे बोलताना प्रसाद यांनी ‘काहीजण बेरोजगारीच्या मुद्द्याचा वापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत. ‘आम्ही सर्वांना सरकारी नोकऱ्या देऊ असं कधीच म्हटलं नव्हतं’, तसेच माहिती आणि तंत्रज्ञान, मुद्रा लोन आणि वाणिज्य शाखेत चांगली प्रगती होत असल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना प्रसाद यांनी ‘करदात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचं सांगत जागतिक मंदीच्या काळातही देशाची आर्थिक वाटचाल ही ६ टक्क्यांहून अधिक इतक्या गतीने होत आहे असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183256491840561154?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183249379769012224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!