Share

उसतोड कामगारांसाठी जयदत्त क्षीरसागर सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Published On: 

बीड : ऊस तोडणी साठी कर्नाटक सह राज्यभरात विखुरलेले ऊस तोड कामगार लॉग डाऊन मूळे चार आठवड्यापासून अडकून पडले आहेत, त्यांना आपल्या कुटूंबाकडे घरा दाराकडे जाण्याची ओढ लागली आहे त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे स्वगृही जाण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी असे म्हंटले की आपण मोठ्या हिमतीने बिकट परिस्थिती मध्ये आपली जबाबदारी पार पाडत आहात, आपल्या धर्याला तोड नाही, संकट अन बिकट वाटेतून आपण मार्ग काढण्यात यशस्वी होत आहात, आपल्या मुख्यमंत्री पदाचा प्रवासच अत्यन्त गंभीर परिस्थिती मधून सुरू झाला आहे, आपला संयम आपला धीरोदत्त स्वभाव उभ्या महाराष्ट्र ने पहिला आहे, संकट प्रसंगी आपली कठोर आणी कुटूंबप्रमुखाची भूमिका महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल.

आपले निर्णय देशाला दिशादर्शक ठरतील , बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार ऊस तोडणी साठी कर्नाटक , सीमा भागात अन राज्यभरात विखुरला गेला, लॉग डाऊन सुरू झाल्यामुळे हा थकलेला कामगार आपल्या कुटूंबापासून घरा दारापासून कोसो दूर अडकला आहे, तब्बल 20 दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे या ऊस तोड कामगाराला आता त्याच्या कुटूंबाची घरा दाराची ओढ लागली आहे, साखर कारखानदारांनी या कामगारांना कठीण परिस्थिती मध्ये तुटपुंजी मदत केली आहे, त्या सर्व कारखानदारांना भरीव मदत करण्याचे आवाहन करून या कामगारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना गावाकडे जाऊ देण्याची सूचना करावी असे या पत्रात त्यांनी म्हंटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!