Share

‘राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात पंतप्रधान नाही’ : जावेद अख्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूडचे गीतकार जावेद अख्तर यांची एक खास ओळख आहे. ते सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक मुद्यांवर ते आपल मत परखडपणे मांडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या ट्वीट चांगलीच चर्चा होत असून यावर अनेक लोकानी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त एक ट्विट केलं होतं.

सलमान खुर्शीद यानी केलेल्या या ट्वीटमध्ये राजीव गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो होतो आणि त्यासोबत एके काळचा आणि भविष्यातील ‘लोकशाहीतील राजा’असे लिहीले होते. यामध्ये त्यांनी राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान असतील असं म्हटलं होतं. खुर्शीद यांच्या या ट्विटवर अनेकांनी टीका देखील केली. जावेद अख्तर यांनी देखील ट्विटमधून राहुल गांधींसोबत पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विट करत राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात पंतप्रधान नाही असे म्हटले आहे.जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमधून सलमान खुर्शीद यांना उत्तर दिलं आहे.  ‘ तुमचा विरोधाभासातील “लोकशाहीचा राजा” हा अत्यंत दयनीय आहे. राहुल गांधी यांना एक श्रेष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून स्विकारता येईल पण त्यांना जे कोणी पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत ते नरेंद्र मोदींना कायमस्वरुपी पंतप्रधानपदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.’

या ट्विटवरुन अनेकांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे आपण डोळे बंद करुन त्यांच्याविरुद्ध लिहित आहात. भाजपाच्या आयटीसेलने त्यांची प्रतिमा खराब केली आहे. असे सोशल मिडियावर अनेकजण म्हणत आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदावर मानत आले आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी गेल्या वर्षी राहुल गांधी २०२४ साली पंतप्रधान झाल्यानंतर राजकारणातून संन्यास घ्यायला हवा असे म्हटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!