मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकताच ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहे. बॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर जान्हवी कपुर आता टॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. करण जोहर निर्मित चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूसोबत ती स्कीन शेअर करणार आहे.
जान्हवी कपूर बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करण्यासाठी तयार आहे.जान्हवी कपूरच्या दाक्षिणात्या चित्रपटात पदार्पणाची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. जान्हवीला साइन करण्यासाठी अनेक दक्षिणात्य निर्माते आपल्या चित्रपटांसाठी तिला विचारत होते. मात्र महेश बाबूसोबत जानव्ही टॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने पूर्णविराम लागला आहे.
करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्माता करण महेश बाबू आणि जान्हवी यांच्या या चित्रपटासाठी सध्या एका तरूण दिग्दर्शकाच्या शोधात आहे. करणला या चित्रपटाचं चित्रीकरण ६० दिवसात संपवायचं आहे.महेश बाबूचे वडील कृष्णा आणि जान्हवी कपूरची आई श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. प्रेक्षकांनी या जोडीला भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळे आता जान्हवी आणि महेश बाबू यांच्याकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी
- सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

