🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानं उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. जडेजाच्या जागी मराळमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीदेखील घेतली आहे.
टीम इंडियाने सलामीवीर के. एल. राहुल (51 धावा) आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला.
रवींद्र जडेजाच्या पायाला कॅनबेरावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाला संघाबाहेर बसावे लागले होते. त्यामुळे युजवेंद्र चहल याला जडेजाच्या जागी संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने करत कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.
पण बदली खेळाडूच्या मुद्द्यावरुन वाद देखील सुरु झाला आहे. रवींद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली असून उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

