Share

‘काँग्रेस -राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात कायम अस्थिर सरकार ठेवलं, त्यामुळं राज्याचा विकास होऊ शकला नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढताना दिसतो आहे. काल राज्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या झंजावती जाहीर सभा झाल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी काल सांगली जिल्ह्यात जत, अक्कलकोट तसंच लातूर जिल्ह्यात सभा घेतल्या.

राज्यातील अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण करत नदीजोड प्रकल्प अग्रक्रमानं पूर्ण केला जाईल, असा निर्धार त्यांनी जत इथल्या सभेत व्यक्त केला. तर अक्कलकोट विधानसभेची लढाई ही सामान्य कार्यकर्त्यां विरुध्द बाहुबलीची आहे असं ते अक्कलकोट इथल्या प्रचार सभेत म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात कायम अस्थिर सरकार ठेवलं, त्यामुळं राज्याचा विकास होऊ शकला नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल केली. नाशिक इथं काल भाजप कार्यकर्त्यांच्या संमेलनात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल सातारा, पिंपरी चिंचवड इथं सभा घेतल्या. कृष्णा आणि कोयना नद्यांच पावसाळ्यातील पूराच वाहून जाणार पाणी, दुष्काळी भागाला देण्याच नियोजन करण्यात आल्याचं ते सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्यात माण इथं आयोजित सभेमध्ये बोलताना म्हणाले.

काँगेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात कधीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं जनतेला दिली आहेत. त्यामुळं त्यांनी आधीच हार पत्करली असून भविष्यात जर विरोधी पक्ष नेता कोणाला बनवायचे असेल तर दोन्ही काँग्रेसचं विलीनीकरण केल्याशिवाय विरोधी पक्षनेताही देता येणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी पिंपरी-चिंचवड इथं बोलताना केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182613234932543488?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182612857701068803?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!