Share

IPL 2022: आयपीएलसाठी मैदानाची निवड झाली; ‘या’ मैदानांवर खेळवले जाणार सामने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन पूर्ण झाल्यापासून, क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धा कुठे खेळवली जाणार याची उत्सुकता होती. आता मैदानांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम या चार ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

स्पर्धेतील ५५ सामने मुंबईत तर १५ सामने पुण्यात खेळवले जाणार आहे. तसेच अंतिम सामना अहमदबाद मध्ये म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. स्पर्धा कधी सुरु होईल यावर अजूनही चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक सांगताना एका अधिकाऱ्याने सांगितले आहे ” शनिवार जर सुरुवातझाली तर ब्रॉडकास्टरला पहिल्या आठवड्यात चांगले व्हीयूआरशीप मिळवून देईल. रविवारचे उद्घाटन तसे होऊ देणार नाही. बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टर्समध्ये यावर चर्चा झाली आणि अखेरीस ती २६ मार्च असू शकते”

बीसीसीआयने सुरुवातीला २७ मार्च रोजी सुरुवातीची तारीख निश्चित केली होती परंतु त्याऐवजी २६ मार्चला आयपीएल २०२२ सुरू करण्याच्या स्टारच्या प्रस्तावावर विचार करत आहेत. ब्रॉडकास्टर स्टारला IPL 2022 २६ मार्च, शनिवारपासून सुरू करायचे आहे. कारण त्यांना २७ तारखेला डबल-हेडर आयोजित करायचा आहे जो रविवार असेल. आयपीएलच्या पहिल्या दिवशी यापूर्वी कधीही दुहेरी हेडर पाहायला मिळाले नाही. त्यामुळे सुरुवात रंजक बनवण्यासाठी आयपीएलची सुरुवात पहिल्यांदा डबल हेडर म्हणजे दुहेरी सामन्यासोबत होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!