Share

IPL 2022 : आयपीएलच्या उद्घाटनाची तारीख ठरली ; मैदानावर गर्दीही दिसणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल स्पर्धेची सुरुवात कधीपासून होणार याची वाट चाहते मेगा ऑक्शनपासून पाहत होते. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पर्धेची सुरुवात २६ मार्चपासून होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बीसीसीआयचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी संबंधी माहिती दिली आहे.

“आयपीएल शनिवार,२६ मार्चपासून सुरू होईल,” असे ब्रिजेश पटेल यांनी जीसी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले आहे. या हंगामात लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांना जोडण्यात आल्याने, मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमसह नवी मुंबईचे डीवाय पाटील मैदान आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ७४ सामने खेळवले जातील.

तसेच क्रिकेट रसिकांसाठीही खुश खबर मिळाली आहे. दोन वर्षानंतर प्रेक्षकांना आयपीएलचे सामने मैदानावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल आणि सुरुवातीस ते ४० टक्के असेल. जर कोविडची परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि प्रकरणे कमी झाली, तर स्पर्धेच्या शेवटी ते स्टॅन्ड भरलेले दिसतील. २६ तारखेपासून सुरु झालेली स्पर्धा २९ मे रोजी संपणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!