पुणे : बंजारा समाजातील युवती पूजा चव्हाण हिने काही दिवसांपू्र्वी पुण्यात आत्महत्या केली. यामागे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा हात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तिच्या आत्महत्या प्रकरणाची राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील नव्हे तर देशभरातील युवतींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तिच्या मृत्यूत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे काही पुराव्यांमधून सिद्ध होत आहे. त्या अनुषंगाने प्रकरणाची चौकशी करताना राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही भीड न ठेवता आत्महत्येचा योग्य तपास करावा, तसेच संबधित मंत्र्याला शिक्षा होण्यासाठी न्यायपालिकेत साक्षीपुरावे जमा करावेत अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रत्यक्ष भेटून पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश युवती आघाडी संपर्क प्रमुख डॉ.पुनम राऊत, भाजप युवा मोर्चाच्या पूजा आल्हाट, अर्पिता कुलकर्णी, स्मिता तावडे, अॅड, तृप्ती नखाते, स्मिता गायकवाड यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस आणि मी मुख्यमंत्री राहिलो, नवाब मलिक स्पर्धेत नाहीत’
- देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

