🕒 1 min read
नवी दिल्ली : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
एकीकडे अमेरिकेची मॉर्डना आणि फायझरची कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्यासाठी सज्ज झालेली असतानाच दूसरीकडे आता भारतीयांना देखील स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भारतातील कोरोना लसीकरणाबद्दल आढावा बैठक घेतली आहे. त्यांनी भारतीयांना त्यावेळेस मोठी दिलासादायक माहिती दिली आहे.
तज्ञांच्या मते, कोरोना प्रतिबंधक लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही. त्याचबरोबर ती लस येत्या काही आठवड्यांमध्ये तयार असेल. त्याला वैज्ञानिकांनी हिरवा कंदील देताच भारतामध्ये लसीकरणाला सुरूवात होईल अशी माहिती मोदींनी दिली आहे.
दरम्यान आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांशी लढणार्या वयोवृद्धांना कोरोना लसीकरणामध्ये प्राधान्य असेल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. भारतीय संशोधकांना कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल आत्मविश्वास आहे. सध्या सार्या जगाचे भारताकडे लक्ष आहे. ते स्वस्त आणि सुरक्षित लस यांची वाट पाहत असल्यामुळे साहाजिकच त्यांचं भारताकडे लक्ष असेल असेदेखील, ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे : आप
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- ‘जुग जुग जियो’च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

