🕒 1 min read
पुणे :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव आणि १३७ धावांनी जिकंला आहे . भारतीय संघाने विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारला होता.त्यानंतर दक्षिण आफ्रिकाने पहिल्या डावात २७५ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका संघावर फॉलोऑन लादला होता.
परंतु दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि दक्षिण आफ्रिकाचा पूर्ण संघ १८९ धावत बाद झाला. भारतीय संघाने हा सामना एक डाव व १३७ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २ -० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान दुसऱ्या डावात भारताकडून उमेश यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३, रविचंद्रन आश्विनने २ तर इशांत आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेतला. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

