Share

माण मतदारसंघात ‘ हे ‘ दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : माण विधानसभा मतदार संघात दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. माण मतदार संघात भाजपकडून जयकुमार गोरे आणि शिवसेनेकडून शेखर गोरे हे सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राज्यात भाजप – शिवसेना युती असली तरी माण मतदारसंघ मात्र याबाबत अपवाद असल्याचे दिसून येत आहे.

माणमध्ये जयकुमार गोरे हे सध्याचे आमदार आहेत. ते यापूर्वी कॉंग्रेसचे आमदार होते. त्यांनंतर त्यांनी भाजपात पक्षांतर केले. तर जयकुमार गोरे यांचा भाऊ शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी माण मतदारसंघावर दावा केला होता. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. तर शेखऱ गोरे यांनी जोरदार विरोध करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता माण मतदार संघात भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे.

दरम्यान, दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात प्रचारसभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर याच मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनीही गोरे बंधुवर जोरदार टीका करत आहे. जयकुमार गोरे आणि त्याचे बंधू शेखर गोरे यांची माण मतदारसंघात दहशत आहे. त्यामुळे जनतेला विकास हवा आहे. त्यासाठी परिवर्तन करायचे ठरवले आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182618813210083328?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182620799988928512?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!