Share

‘पंतप्रधानांनी सहा वर्षात फक्त मन की बात केली, जन की बात केली नाही’

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा मावळली आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र,पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, शिवसेनेने राज्यभर मोर्चे काढले होते. दरम्यान, यावरून कॉंग्रेसही आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय. निर्मला सीतारामन आज मुंबईत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. निर्मला सीतारामन मुंबईतील दादर येथील भाजपच्या कार्यालयात येणार आहेत. त्यांच्यासमोरच काँग्रेस नेते निदर्शन करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि कॉंग्रेस कार्यकर्ते दादर स्टेशन परिसरात निषेध करत आहेत.

‘आम्ही देशांच्या अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहोत. २ कोटी रोजगार तुम्ही देणार होता, त्याचं काय झालं. आज तरुण रस्त्यावर आला आहे. ३९२ रुपयांचे सिलेंडर ७१९ रुपये कसे झाले? तुळ डाळीसह खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ महाग झाले आहेत. गरीबांचा आवाज काँग्रेसने कायमच वाढवला आहे. ज्या देशाच्या पंतप्रधानांनी सहा वर्षात फक्त मन की बात केली. जन की बात केली नाही. महागाई आणि गरीबापासून गरीबाची सुटका करा. बेकारांच्या गरीबांच्या हाताला काम द्या. स्वयंपाक घरातील गृहीणीला आधार द्या, असे म्हणत भाई यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!