🕒 1 min read
पुणे : पिंपरी-चिंचवड परीसातील नागरिकांसाठी धक्कादायक वृत्त आहे. शहरातील आणखी चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या चौघांसाहित आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्याही 52 वर जाऊन पोहचली आहे.
कोरोना झालेल्या चौघांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश. हे चौघेही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवडमधले काही रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत. 12 रुग्णांना आता घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोना बरा देखील होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा मेहनत घेत आहे. मात्र त्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचीही गरज आहे.


