उस्मानाबाद: कडक लॉकडाऊन लावायचा मग नंतर १५ दिवसांनी सूट द्यायची, असं केलं तर नागरिक बाहेर पडणारच. प्रत्येक घरातला एक जरी माणूस बाहेर खरेदी साठी निघाला तरी गर्दी होणारच आहे. यात नागरिकांचाही काही दोष नाही, पण जर गर्दी करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर मात्र ते धोकादायक. सकाळी ४ तास मार्केट सुरु ठेवायचं घाईगडबडीत नागरिक गर्दी करून पटापट सामान खरेदी करून घरी जायची घाई करणार यात नियमांचे उल्लंघन होणार.
जवळपास पंधरा दिवसांच्या कडक जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट असलेल्या बाजारपेठेत जनता कर्फ्यूमध्ये सूट देताच सोमवारपासून तोबा गर्दी झाली. सकाळी ७ ते ११ या वेळेत काही अत्यावश्यक बाबींसाठी प्रशासनाने सूट दिली आणि बाजारपेठेत गजबज झाली. विशेषत: भाजी मंडईत अधिक गर्दी वाढल्याने फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. ११ नंतर मात्र बाजारपेठ बंद करण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलली आणि वर्दळ कमी झाली. मात्र, या गर्दीमुळे नियंत्रणात येऊ पाहणारा कोराेना पुन्हा वाढण्याचीच भीती आहे.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. भाजीपाला, फळे, किराणा साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा कमी होत असलेला आकडा पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. बाजारात आलेल्या अनेक नागरिकांनी व विक्रेत्यांनी मास्क देखील घातले नव्हते, हे विशेष. त्यामुळे प्रशासनाने साथ आटोक्यात येईपर्यंत नियम कठोर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोविड नियमांचे उल्लंघन, ‘या’ खेळाडूची पीएसएलमधून हकालपट्टी
- ‘आमच्या घरांवर तुळशीपत्र ठेवले तरी चालेल पण सर्वसामान्य जनतेचे जीव वाचवले पाहिजे’, धनंजय मुंडेंचे वक्तव्य
- फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड नाही तर सगळ्यांसमोर चर्चा झाली; सामंतांचे स्पष्टीकरण
- ‘मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’ का लिहीत नाही?’, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
- कोरोनाची तिसरी लाट आली? बीड जिल्ह्यात ८ हजार बालके कोरोना बाधित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

