औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना उलटून गेला आहे. मात्र अजूनपर्यंत संप पूर्णपणे मिटलेला नाही. औरंगाबाद विभागातून रविवारी सुट्टीच्या दिवशी ४० बसेस धावल्या तर एकूण २ हजाराहून अधिक प्रवाशांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रवास केला. परिवहन मंत्री अनिल परब यांचा विशेष आवाहनानंतरही आज कोणतेही नवे कर्मचारी रुजू झालेले नाही. आत्तापर्यंत २२ चालक ३६ वाहक तर ३ इतर कर्मचारी रुजू झालेले आहेत. औरंगाबाद विभागातून आत्तापर्यंत केवळ ६१ कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात महामंडळ कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्यापही सुरूच आहे. मात्र दुसरीकडे संपात फूट पडल्याने आतापर्यंत औरंगाबाद विभागात ६१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. मात्र ही संख्या २ ते ३ दिवसांपासून एवढीच असल्याने बसच्या फेऱ्या वाढविण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. रविवारी (दि.१२) औरंगाबाद-पुणे मार्गावर अठरा खासगी शिवशाही चालवण्यात आल्या.
आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर ८ बसने सोळा फेऱ्या करण्यात आल्या. यात १४६ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड एका बसने २ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ३ शिवशाही बसच्या ६ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. एकुण ४० बसने ६२ फेऱ्या केल्या असून २०३१ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे.
सोमवारी नवे कर्मचारी रुजू होण्याची शक्यता
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सोमवार पर्यंत रुजू होण्याचे आवाहन केलेले आहे. जे कर्मचारी सोमवारपर्यंत रुजू होतील त्यांचे निलंबन करण्यात येणार नाही. असा दिलासाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याचा अजून पर्यंत कर्मचाऱ्यांवर फारसा फरक पडलेला नाही. औरंगाबाद विभागातून या आवाहनानंतर एकही नवा कर्मचारी रुजू झालेला नाही. तसेच संपकऱ्यांनी आम्ही या आवाहनाला जुमानत नाही असे म्हणत रुजू होणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी या संपात फूट पडण्याची शक्यता असून काही कर्मचारी रुजू होतील.
महत्त्वाच्या बातम्या
- सारा अली खान, जान्हवी कपूर, सारा तेंडूलकर यांना नाईट पार्टी पडली महागात!
- महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना फासले काळे; कार्यकर्त्यांकडून उद्या बेळगाव बंदची हाक
- पेपरफुटी प्रकरणी अभाविप आक्रमक; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने
- ‘तू अमिताभ सारखा..’ म्हणत नेटकऱ्यांनी केले अभिषेक बच्चनला ट्रोल
- ‘त्याने ५ वर्षे संघाची कमान सांभाळली आणि…’, कोहलीबाबत रोहितचे मोठे वक्तव्य

