🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यानिमित्त ते राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. यानिमित्त ते लातूरमधील उदगीर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘ईडी का फिडी मला कोणी काही करत नाही’ असं विधान केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी ‘ईडी का फिडी मला कोणी काही करत नाही. मला सगळ्यांचे फोन आले, असं करु नका. तिकडे जाऊन नका असे अनेकजण सांगत होते. मी म्हणालो जाऊन येतो. पण त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाऊ नका. तसेच पोलिसांनी ही सांगितलं तुम्ही पण मुख्यमंत्री होता, तेव्हा असं करु नका असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले. त्यांनी मोठ्या लोकांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बँका वाचल्या पाहिजेत म्हणून यांनी ही कर्जमाफ केल्याचे सांगतात. पण मग शेतकरी वाचला असं वाटतं नाही का? असंही ते म्हणाले.
दरम्यान, शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवारांचे नाव आले होते. त्यांच्यासह अनेक आजी माजी आमदार खासदारांचा यात समावेश होता. या घोटाळ्यात नाव येताच शरद पवारांनी इडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर त्यांनी तो मागे घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183019244633485314?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183018341323010049?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183008771821330434?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

