🕒 1 min read
मुंबई : कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे.
त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा दावा केला आहे.
यावर आता काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. ‘आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. असा इशाराच ठाकूर यांनी थेट शरद पवार यांनाच दिला आहे.
आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020
काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020
तर, काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे. अस देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. शरद पवार हे काँग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते असताना यशोमती ठाकूर यांनी थेट पवारांवरच प्रहार केल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे.
महाविकास आघाडीची स्थापना करण्यात काँग्रेस कडून अहमद पटेल यांनी सर्वात मोठी भूमिका होती मात्र आता त्यांचं निधन झाल्याने आघाडीत समन्वय साधण्यात कमी येणार आहे त्यामुळे ठाकूर यांचे विधान हे आघाडीत बिघडी होण्यासाठी ठिणगी टाकू शकते हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

