पुुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
पुणे शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता पुणे महानगरपालिकेने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. पहिल्यांदा मास्क न घातल्यास 500 रूपयांचा दंड भरावा लागेल, पुन्हा तोच व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास त्याच्याकडून 1 हजार रूपयांचा दंड वसूल केला जाईल, असं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितलं.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. 19 फेब्रुवारी रोजी राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतकं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

