मुंबई : सध्या लोकांमध्ये डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे अनेकदा ग्राहकांना अडचणीचा देखील सामना करावा लागतो. तर आता ग्राहकांच्या या कार्डने व्यवहार करणाऱ्या किंवा एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने यामध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे होणाऱ्या अयशस्वी व्यवहारांवर यापुढे ग्राहकांना अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. जर पुरेशी रक्कम खात्यात शिल्लक नसेल तर त्यासाठी २० रुपये आणि त्यासोबत जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. बँक नॉन फायनेंशियल ट्राजेंक्शनवरही चार्ज लावणार आहे. त्याचबरोबर ग्राहक मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करत असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील, अधिकच्या व्यवहारांसाठी बँकेकडून १० रुपये ते २० रुपये आणि जीएसटी शुल्क आकारण्यात येतील
एसबीआय कडून एक महिन्यात सेव्हिंग खातेधारकांना ८ वेळा मोफत ही सुविधा देत असते, यातील ५ वेळा SBI एटीएममधून तर ३ वेळा इतर बँकांच्या एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकतात. गैर मेट्रो शहरांमध्ये १० वेळा पैसे काढणे-भरणे याची मोफत सुविधा पुरवण्यात येते, यातील ५ वेळा एसबीआय मधून तर इतर ५ वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मभा देण्यात आली आहे. एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासते, बँकेने ग्राहकांना १० हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे.
एसबीआय बँकेच्या सर्व एटीएम केंद्रावर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे. बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०२० पासून ओटीपी आधारित सेवा सुरु केली आहे. जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये येतो, त्यावेळी त्याला ओटीपी विचारला जातो, हा ओटीपी ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो, ओटीपी आधारित Cash Widrawal सुविधा फक्त एसबीआय एटीएममध्ये उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना


