पुणे : बीड जिल्ह्यातील शिरूर कासारचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर सव्वा महिन्यापूर्वी औरंगाबादच्या तरुणीने अत्याचाराचे आरोप केले होते. दरम्यान, तांत्रिक तपासात शेख यांच्याविराेधात कुठलाही सबळ पुरावा हाती लागला नसल्याचा औरंगाबाद पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात तक्रारदार महिला व शेख यांच्या संपर्कात त्या दरम्यान आलेल्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.
यासंदर्भात विविध पक्षांसह संघटनांनी देखील योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल होऊन देखील मेहबूब शेख याला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, संबंधित पीडितेने आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची भेट घेऊन कशा पद्धतीने दबाव टाकला जात आहे, तक्रार दाखल केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या धमक्या याबाबत आपली व्यथा मांडली आहे.
यानंतर, तृप्ती देसाई व संबंधित महिलेने पत्रकारांशी संवाद देखील साधला. ‘सव्वा महिना होऊन देखील मेहबूब शेख याला अटक केली जात नाही. मेहबूब शेख याच्या संबंधित पक्षाकडून पीडितेला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. दबाव आणला जात आहे, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. तर, येत्या ५ दिवसांत मेहबूब शेखला अटक न केल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही,’ असा इशारा देखील यावेळी पीडितेने दिला आहे.
https://www.facebook.com/trupti.desai.589/videos/3751129664976928/
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?


