टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि शेतकऱ्यांचे पाठीराखे राजू शेट्टी हे पराभव विसरून शेतकऱ्यांसाठी आक्रमक होत पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सरकारला देत आहेत.
कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे, बांगलादेशचे लावलेले निर्यात शुल्क माफ करावे या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाहीत तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे.
नांदगाव मधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने ५५ गायी मृत झाल्या आहेत. या गायींच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी नाहीतर वसुलीला येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

