Share

ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित राज्यात सत्ता स्थापन करेल – आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीविषयी मोठ विधान केले आहे. त्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या. त्यामुळे भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. यावेळी ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या प्रचारासाठी यवतमाळ येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘ईव्हीएम नसते तर लोकसभेत आम्ही 12 जागांवर विजय मिळविला असता. मात्र आता ईव्हीएम हॅकरच आपला व्यवसाय बुडण्याच्या भीतीने ईव्हीएम हॅक करणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाजप देशात चुकीचे चित्र रंगवते, असा आरोप त्यांनी केला. लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुबण्याच्या अवस्थेत आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी ‘शासनाची तिजोरी रिकामी आहे. व्यापारी, कारखानदार, कामगार सर्वच घटक सरकारमुळे त्रस्त आहे. कापसाचे दर चार हजार क्विंटल दर जात नाही. या सर्वबाबींमुळे जनता त्रस्त झाली असून, या निवडणुकीत आम्हीच खरे विरोधी पक्ष असल्याचे समोर येईल असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, आंबेडकर यांनी ‘वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देऊन कृषी उद्योग निर्माण करू यामुळे रोजगार वाढेल, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू करू, दुष्काळी भागात शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करू अशी आश्वासने आंबेडकर यांनी दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182981218121289728?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182980959206948865?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182979721455259649?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!