🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: युवक काँग्रेसचा तालुक्यातील अध्यक्ष असल्यापासून पासून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काम केलं आहे. माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे पवार यांना सोडल्याची हूर हूर कायम आहे, असं शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
बार्शीमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी माझ्यावर कोणतीही आक्षेपार्ह टीका केली नाही. माझ्या विषयी काही बोलले असतील तर त्यांचा तो अधिकार आहे. आजपर्यंत त्यांच्यावर कधीही टीका केली नाही, यापुढे देखील करणार नाही, असं देखील सोपल म्हणाले आहेत.
आमच्या पिढीचे राजकारण आता मागे पडले आहे. तरुणांना आमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांचा आग्रह आणि तरुण पिढीच्या राजकारणासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला, यापूढे सर्व राजकारण हे तरुणांच्या विकासासाठी करणार असल्याचं सोपल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183219825524428800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183216597806149632?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

