औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती परदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते.
मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
यानंतर आता राज्य सरकारला एक पाऊल मागे घेतलं आहे. सरकारने नवी नयमावली जाहीर केली असून शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.
भाजप, मनसेसह शिवभक्तांची शिवजयंतीवरील बंधनावरून नाराजी कायम असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. ‘जेव्हा पहिला जी आर काढला तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो होतो. त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्री महोदयांना जीआर बदलवायला हवा असं सांगितलं होतं. निर्बंध घालण्याऐवजी मोकळेपणाने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमांचे पालन करुन व्हायला हवी,’ अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनपाकडून ४३० किलो प्लास्टिक जप्त, पण ते शहरात आलेच कसे?
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ‘वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’, सरदार वल्लभभाईंच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा
- ‘पूजा चव्हाण यांच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी’


