Share

मावळातील जनतेचा आशीर्वाद आणि विकासकामांमुळेचं मंत्रिपद – बाळा भेगडे

Published On: 

🕒 1 min read

मावळ : जनतेच्या आशीर्वादाने आणि विकासकामांमुळेचं मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे आता ही विकासाची वाट आपण धरून ठेवायची आहे. विकास करणे हेच आपल्यासमोर लक्ष्य असणार आहे, असे म्हणत मावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांनी आंदर मावळमधील जनतेशी संवाद साधला.

आज बाळा भेगडे यांनी आंदर मावळ मधील सावळा, पिंपरी आणि तळपेवाडी या गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांकडून बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ‘कहो दिलसे, बाळा भाऊ फिरसे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

भेगडे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केले. मावळ तालुक्याला जनतेच्या आशीर्वादानेचं मंत्रिपद मिळाले. आज विकसित तालुका म्हणून मावळ ला ओळखले जाते. म्हणूनचं विकासाची वाट आपल्याला सोडायची नाही. तालुक्याचा विकास करणे हेच आपले ध्येय असणार आहे, असे भेगडे म्हणाले.

यावेळी ग्रामस्थांनीही भेगडे यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. बाळा भेगडे यांनी रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी भरघोस मदत करून आमच्या गावाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी आमदार नको मंत्रीच हवा ज्यामुळे मावळचा सर्वांगसुंदर विकास होईल, असे ग्रामस्त म्हणाले.

मावळातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. महायुती आणि महाआघाडीचे दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराच्या फेऱ्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बाळा भेगडे तिसऱ्यांदा नशीब अजमवण्यासाठी उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182964519930253312?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182960024483577856?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!