🕒 1 min read
मुंबई: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामान्यांपासून ते कित्येक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही सेलिब्रिटी बरेही झाले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता अंगद १६ दिवसांची कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून आपल्या घरी परतला आहे. घरी परतताच आपल्या कुटुंबासोबतच्या भेटीचा हा क्षण त्याने चाहत्यांसोबतही शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CPLfuJhJof5/?utm_medium=copy_link
आपल्या कुटुंबासोबतच्या भेटीचा क्षण अंगदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत अंगदने लिहिलं, ‘कोरोना तू सगळ्या मनुष्यजातीवर तुझा प्रभाव दाखवत आहेस. ही वेळ खूप कठीण आहे. परंतु, यामुळे एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आम्हाला आमच्या माणसांची किंमत कळाली. मी अखेर १६ दिवसांनी कोरोनावर मात करून पुन्हा माझ्या कुटुंबाला भेटलो आहे. माझी पत्नी नेहा आणि मुलगी मेहेर यांना पाहून मी खूप आनंदी आहे. त्या स्वतः खूप कठीण परिस्थितीला तोंड देत होत्या. घरी परत येण्याशिवाय चांगली दुसरी कोणतीही भावना नाही. मी माझ्या घरी आहे. देवाची आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहू दे.’
त्याने शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवातीला नेहाचां आवाज येत आहे. नेहा पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या आपल्या मुलीला तिचे बाबा घरी आल्याचं सांगते. मागे वळताच अचानक बाबा दिसल्याने ती धावतच अंगदच्या कुशीत शिरते. तो आपल्या मुलीला उचलून घेतो आणि तिचे लाड करायला लागतो. यावेळी अंगद आणि नेहाच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
- निलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

