टीम महाराष्ट्र देशा : २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. काल या घटनेला ४४ वर्ष पूर्ण झाली. राज्य शासनाकडून आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली आहे.
दरम्यान, एक महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार आणि एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास भेगलेल्यांना पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येते. यावर १९७५ ते १९७७ काळात तुरूंगवास भोगलेल्यांची संख्या किती ? त्यांपैकी सध्या हयात किती ? यासोबतच किती जणांना दरमहा ५ हजार आणि कितींना १० हजार रुपये पेन्शन दिली जाते ? याचा सरकारी तिजोरीवर दरमहा आर्थिक भार किती पडतो ? याबाबतची माहिती सरकारकडं उपलब्ध आहे का, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी उपस्थित केले.
१९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांची संख्या किती? त्यांपैकी सध्या हयात किती? यासोबतच किती जणांना दरमहा ५ हजार आणि कितींना १० हजार रू. पेन्शन दिली जाते? याचा सरकारी तिजोरीवर दरमहा आर्थिक भार किती पडतो? याबाबतची माहिती सरकारकडं उपलब्ध आहे का?#MonsoonSession pic.twitter.com/dk6jxfNn4Y
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 25, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

