बारामती : कोरोनाची बाधा झालेले सात रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक जे निगेटीव्ह आहेत.
मात्र त्यांनादेखील होम क्वारंटाईन केले आहे. अशा नागरिकांना राहण्यासाठी जर उपलब्ध घर नसेल किंव्हा एखाद घर लहान असेल अशा बारामती शहरातील नागरिकांची शासनाने होम क्वारंटाईन करून त्यांची व्यवस्था वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केली आहे.
या लोकांना येथे राहण्याची,जेवणाची तसेच रोजच्या लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. बारामती तालुका व बारामती शहरातील होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जिल्हा उपरूग्णालय आरोग्य पथक डॉक्टरांच्या देखरेखेत ठेवणार आहेत.
बारामती शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांच्या नातेवाईक किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन केले जाते. नागरिकांना शासनाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय येथे १६२ बेडची राहण्याची व्यवस्था केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

