अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली.
या सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. रोहितने गेलचा सिक्सचा एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहितने या मॅचमध्ये 34 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 64 धावांची तुफानी खेळी केली. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक सिक्सर लगावणारा पहिला फलंदाज ठरला.
रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना 5 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स मारण्याची ही 10 वी वेळ ठरली. रोहित या सामन्याआधी या रेकॉर्डबाबतीत गेलच्या बरोबरीत होता. पण आता रोहितने गेलला पछाडलं आहे. त्यामुळे रोहित पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. तसेच आता कॉलिन मुनरो आणि ख्रिस गेल संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी एका डावात एकूण 9 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे.
रोहितने या सामन्यात अर्धशतकासह आणखी एक विक्रम केला. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहितने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला पछाडत दुसरं स्थान पटकावलं. रोहितने 40 धावा पूर्ण करताच हा विक्रम आपल्या नावे केला. ताज्या आकडेवारीनुसार आता टी 20 मध्ये रोहितच्या नावे 111 सामन्यात 2 हजार 864 धावांची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रांनी चौकशी केली तर फटक्यांची माळ लागेल, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
- जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट; भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा


