Share

हिंगोलीचे प्रेमीयुगूल ‘सैराट’ होण्यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात!

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली: प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात तसा प्रत्यय हिंगोलीत आला आहे, येथील प्रेमी युगुल ‘सैराट’ होत होते परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, प्रेमाच्या आणाभाका घेऊन कायम एकमेकांसोबत राहण्याचा निश्चय करून सैराट स्टाईलने हिंगोलीहून निघालेल्या एका जोडप्यास पूर्णा रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या संदर्भात योग्य कारवाई करून सदर जोडप्याची रवानगी हिंगोली पोलिसांकडे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीशी सुत जुळविले. युवकाने सदर मुलीस प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांसोबत कायम राहण्याचा निश्चय या दोघांनी केला होता. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या सर्व घटनेची माहिती मराठवाड्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली. या दोघांचा शोध पोलिसांनी सुरू केला.

दरम्यानच्या काळात सदर जोडपे हिंगोली येथून वाहनाने पूर्णा रेल्वे स्थानकावर आले. पूर्णा रेल्वे स्थानकावरून मिळेल त्या रेल्वेने सदर जोडपे आपला पुढचा प्रवास करणार होते. परंतु, हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सतर्कता बाळगत पूर्णा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, अक्षय वाघ, चन्नावार, पोलीस उपनिरीक्षक माणिक गुट्टे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी यासंदर्भात सर्व गोपनीय माहिती काढून पूर्णा रेल्वे स्थानकावर कसून चौकशी केली. या पाहणीमध्ये चौकशीमध्ये ते दोघे जण आढळून आले.

त्यानंतर तात्काळ या दोघांना पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल महिला शिपाई पोलीस स्थानकात आले त्यांनी रितसर कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणात युवकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८,२६३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!