बाजार सावंगी : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील १४० शिव छत्रपतींच्या स्मारकावर तसेच कोरोना महामारीच्या काळात लढलेल्या आरोग्य, पोलीस, व इतर कर्मचारी तसेच कोरोना योद्ध्यांना मानवंदना म्हणून शिवछत्रपती पुतळा व गावांवर हेलिकॉप्टरद्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली.
या कार्यक्रमात बाजार सावंगी तालुका खुलताबाद येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान व शिवशंभू संघटनेचा समावेश असल्याने बाजार सावंगीच्या बाजारपेठेतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास आर. आर. पाटील फाउंडेशन व समस्त शिवभक्त औरंगाबाद यांच्या वतीने दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान धावत्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी समस्त ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
शिवरायांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारा पुष्पवृष्टी होणार असल्याचे बुधवारी प्रत्यक्ष पाहणीने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. सकाळपासून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून पुष्पवृष्टीची प्रतीक्षा करीत होते. दुपारी हेलिकॉप्टरचा आवाज येताना व प्रत्यक्षात पुष्पवृष्टी पाहून शिवछत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
पुष्पवृष्टी होताच संघटना अध्यक्ष व पदाधिकारी संजय नलावडे, जानकीराम नलावडे, योगेश नलावडे, आकाश जाधव, जयदीप नलावडे, गणेश नलावडे, कृष्णा नलावडे, अक्षय नलावडे, कल्याण काटकर, कपिल ढेपले, दिपक दहातोंडे, संजय आवटे आदींनी शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल ही भीती!
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

