🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याची खबरदारी म्हणून काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गरजू व्यक्तिना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सोनू सूद, अजय देवगण, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक कलाकार आपापल्यापरीने मदत कार्य करत आहेत.
तर दुसरीकडे मराठी कलाकारसुद्धा कोरोना काळात मदत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.काही मराठी कलाकार दिवस रात्र कोरोना काळात सेवा करतायेत. कुणी कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. कुणी रक्तदान करत आहे, कुणी जेवणाची सोय करत आहे. अशात करोनाग्रस्तांसाठी आपल्या परीने काहीतरी खारीचा वाटा उचलावा यासाठी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तिच्या अनोख्या उपक्रमात प्रार्थनाने प्रेक्षकांची मदत मागितली आहे.
https://www.instagram.com/p/CPNDRPbsC0l/?utm_source=ig_web_copy_link
प्रार्थना एक उत्तम अभिनेत्री तर आहेच त्यासोबतच ती उत्तम चित्रदेखील रेखाटते. लॉकडाउनमधे प्रार्थनाने अनेक एकाहून एक उत्कृष्ट चित्र रेखाटली आहेत. आता ही चित्र प्रार्थना विकणार आहे आणि आलेल्या पैशातून ती करोनाग्रस्तांची मदत करणार आहे. आपल्या या उपक्रमाबद्दल पोस्ट करत प्रार्थनाने लिहिलं, ‘नमस्कार, करोनाच्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय. हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागतायत. अश्यावेळी मी त्यांच्यासाठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा. लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रिणीकडून ह्या पेंटिंग्स विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली.’
‘स्वतःची कला विकायला कोणालाच आवडत नाही पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून ह्या मधून मिळणारी सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. माझ्याकडून एक मदत म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत हवी आहे. हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहात अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्याकडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा. जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरनी ते घरपोच पाठवले जातील व मी स्वतः त्यांना संपर्क करेन. ह्या उपक्रमा मधून मिळणारा आनंद, समाधान आणि तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ह्या उपक्रमात सामील व्हावे हीच प्रार्थाना.’
महत्त्वाच्या बातम्या
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
- मोठी बातमी : कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

