🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. या स्पर्धेनंतर बीसीसीआयने काही दिवसातच जागतीक कसोटी चॅम्पीयनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात जयदेव उडानकटला स्थान न दिल्याबद्दल माजी क्रिकेटपटु डोड्डा गणेश यांनी नाराजी व्यक्त केली होती. गणेश यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजारानेही उडानकची बाजु घेतली आहे.
जयदेव उडानकटने २०१९-२० या वर्षीच्या रणजी हंगामात शानदार कामगीरी करत ६७ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. रणजिच्या इतिहासात एका हंगामात कोणत्याही वेगवान गोलंदाजाने इतके गडी बाद केले नव्हते. त्याच्या याच कामगिरीचा दाखला देत चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ‘भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेतील प्रदर्शन महत्वाचे असते. आणि जे प्रदर्शन जयदेवने केले ते इतर कोणीही करु शकत नाही. तेव्हा त्याला भारतीय संघात पुन्हा संधी देण्यात यावी’ अशी मागणी पुजाराने केली.
२०१९-२० रणजी हंगामात उडानकटने सौराष्ट्राकडून खेळताना ६७ गडी बाद केले होते. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर सौराष्ट्राने रणजी करंडक पटकावला होता. जयदेव उडानकटने डिसेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र दुर्दैवाने हाच पदार्पणाचा कसोटी सामना त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. यानंतर त्याला एकदाही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यादरम्यान त्याने सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी केली आहे. जयदेवने आतापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळत त्याने ३२७ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

