🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. या स्पर्धेनंतर बीसीसीआयने काही दिवसातच जागतीक कसोटी चॅम्पीयनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. 2 जूनला तो टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना होणार आहे.
या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवालची देखील टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षात मयंक अग्रवालची कामगिरी फार निराशाजनक होती. यामुळे टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये मयंकला जागा मिळणे कठीण झाले आहे. मयंकने करियरची सुरुवात जरी चांगली केली होती. तरी त्याला थोड्या अपयशामुळे टीम इंडियामध्ये स्थान टिकवता आले नाही. त्यामुळे मयंक मानसिकदृष्ट्या अडचणीत आल्याचा धक्कादायक दावा त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक आर. एक्स मुरली यांनी केला आहे.
‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मयंकला स्वत:वरच संशय यायला लागला. सगळं काही आपल्या विचारांवर अवलंबून असतं. जर काहीच योग्य होत नसेल, तर तुमच्या डोक्यात दोन प्रकारच्या गोष्टी येतात. तुमचं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होते. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर संशय घेता. मयंकसोबतही हेच झालं,’ असेदेखील आर. एक्स मुरली म्हणाले आहेत.
‘प्रत्येक खेळाडूमध्ये घबराट असते, तुम्ही यशापेक्षा अपयश जास्त बघता. जेव्हा अपयशाचा विचार डोक्यात आला तरी तुम्ही घाबरता आणि टीममध्ये खूप स्पर्धा आहे, हे तुम्हाला दिसते तेव्हा तुम्ही प्रक्रियेतून बाहेर पडता. ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर मयंकने आपल्या मानसिक स्थितीवर काम केले आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत जबरदस्त पुनरागमन केले अशी प्रतिक्रिया आर. एक्स मुरली यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
- निलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

