Share

तसे करुन त्याला व्हिलन बनायचे नव्हते, अश्विनने केला युवा खेळाडूबद्दल मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू आर अश्विन हा त्याच्या कामगिरीसाठी क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. मात्र गोलंदाजी करताना मंकडींग सारख्या प्रकारामुळे तो अनेकदा वादग्रस्त ठरला आहे. आशातच एका आयपीएल सामन्यात आर अश्विनने युवा गोलंदाजाला फलंदाजाला मंकडींग करुन बाद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्या युवा खेळाडूने अश्विनला सरळ सरळ नकार दिला होता.

मुरली कार्तिकसोबत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात चर्चा करताना अश्विनने हा खुलासा केला. मंकडींगविषयावर बोलताना अश्विनने आयपीएल सामन्यातील एका घटनेचा उल्लेख केला. यावेळी अश्विन म्हणाला की, ‘आयपीएल २०१९च्या स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या एका सामन्यात आखेरच्या चेंडुवर मुंबईला विजय मिळवण्यासाठी २ धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजी करणाऱ्या अंकित राजपुतला मी मंकडींग करण्याचा सल्ला दिला. मात्र अंकितने यावर उत्तर देताना म्हणाला की, असे केले तर मी व्हिलन बनु शकतो. यावर मी त्याला सांगितले घाबरु नको मी तुझ्या पाठीशी आहे, मात्र तरिही त्याने नकार दिला आणि आम्ही तो सामना गमावला.’

त्या सामन्यात आखेरच्या चेंडुवर राहुल चहर आणि अल्झारी जोसेफ ही मुंबईची आखेरची जोडी मैदानावर होती. आखेरच्या चेंडुवर नॉन स्ट्रायकर एन्डवर असलेला राहुल चहर चेंडु टाकण्याआधी बराच पुढे गेला होता. मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यात रविचंद्रन अश्विन हा पंजाबचा कर्णधार होता. महत्वाची बाब म्हणजे या सामन्याआधी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात आर अश्विनने जोस बटलरला मंकडींग पद्धतीने बाद केले होते. यानतंर बराच वाद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!