🕒 1 min read
औरंगाबाद: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना वयाच्या निकाषांनुसार तिकिट मिळणार नसल्याची चर्चा चांगलीच गाजली होती. मात्र बागडे यांनी आपली पुर्ण ताकत पणाला लावून पक्षाकडून तिकिट आणले. बागडेंचे तिकिट कापले जाणार असल्याच्या चर्चेमूळे बागडेंचे विश्वासू प्रदीप (आबा) पाटील, उपमहापौर विजय औताडे, सुहास सिरसाट, भगवान घडमोडे आणि अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदारसंघातून तयारी सुरु केली होती. मात्र बागडेंची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अनुराधा चव्हाण, भगवान घडमोडे, औताडे सोडता प्रदीप पाटील व तालुक्यातील इतरांनी बागडेंचा प्रचारकडे पाठ फिरवली आहे.
फुलंब्री मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे माजी आमदार कल्याण काळे तर महायुतीतर्फे हरिभाऊ बागडे उमेदवार आहे. दोघांतर्फे जोरदार प्रचार सुरु आहे. असे असले तरी सध्या हरिभाऊ बागडे यांचे पारडे जड दिसत आहे. असे असले तरी बागडेंना ही निवडणुक बागडेसाठी सहजतेची नाही. यामूळे बागडेंना मोठी मेहनत घ्यावी लागले आहे. सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत बागडेंना मतदारसंघात फिरावे लागत आहे.
प्रदीप पाटील व इतर काही इच्छुकांना उमेदवारी मिळाली नसल्यामूळे नाराजगी आहे. यात काही जण पक्षाचे कामात गुंतले असले तरही काही लोक नाराजीमूळे प्रचाराकडे पाठ फिरवणू आहे. शहरात प्रचाराची जाबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्याकडे दिली आहे. तर फुलंब्री तालुका अध्यक्ष राम शेळके यांच्या माध्यमातून शहर परिसरातील गावात प्रचार करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182618813210083328?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182617174277382144?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

