Share

जळगावमध्ये बंडखोरी, भाजपकडून युतीधर्म पाळला जात नसल्याचा गुलाबराव पाटलांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पार पडली. परंतु संपूर्ण जळगाव जिल्ह्यात युतीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. कारण भाजपच्या बंडखोरीमुळे जळगावमधील ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील हे नाराज आहेत आहेत.

गुलाबराव पाटील यांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुढाकार घेतला होता. परंतु पाटील यांनी आपल्याला सभेत बोलून द्यावे अशी मागणी त्यांनी केली. भाजपचे बंडखोर भाजपच्याच चिन्हावर निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि भाजपच्या वरिष्ठांना सांगूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

गुलाबराव पाटील यांनी ‘युती झाली असूनही अनेक ठिकाणी भाजपचे बंडखोर पक्षाचं चिन्ह वापरत प्रचार करत आहेत असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भाजप शिवसेनेचे नेते एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहेत. परंतु जळगावमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183355937764962304?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183358611507965953?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!