Share

टाकवे ग्रामस्तांनी बाळा भेगडेंचे केले जल्लोषात स्वागत

Published On: 

तळेगाव दाभाडे : मावळातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. महायुती आणि महाआघाडीचे दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराच्या फेऱ्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. महायुतीचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांनी आज मतदारसंघातील टाकवे गावाला भेट दिली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी आमचं ठरलं ! असे म्हणत बाळा भेगडे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बाळा भेगडे तिसऱ्यांदा नशीब अजमवण्यासाठी उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे. त्यामुळे बाळा भेगडे यांनीही गाव निहाय प्रचाराला महत्व देत मतदारसंघ पिंजून काढला आहे. मावळ तालुका विकासाच्या वाटेवर आता चालत आहे. कमीत कमी वेळात सर्वाधिक विकास करणारा तालुक्यांपैकी मावळ हा एक तालुका आहे, असे बाळा भागडे म्हणाले. तसेच गुरुवारी भेगडे यांनी बुधवडी या गावाला भेट दिली. यावेळीही गावकऱ्यांनी भेगडे यांचे वाजत गाजत स्वागत केले.

गेल्या काही दिवसात बुधवाडी गावात अनेक विकास काम सुरु आहेत. बाळा भेगडे यांच्या माध्यमातून गावातील कामगारांच्या खात्यात 5000 जमा झाले असून गावात 10 घरकुल मंजूर झाले आहेत. तसेच ११६ महिलांचे विमा काढले गेले आहेत. गावकऱ्यांच्या विकासा बरोबर बुधवाडी गावात पायाभूत सुविधांचाही विकास होत आहे. आतापर्यंत गावातील 10 लाख रुपयांचा रस्ता मंजूर झाला असून गावातील स्मशामभूमी साठीही ६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तर पाटबंधारे विभागाकडून 35 लाख रुपयांची योजनाही मंजूर झाली आहे. केंद्र सरकारची उज्वला गॅस योजनाही आज घराघरात पोहचवली जात आहे, त्यामुळे बुधवाडी गावातील जनतेनेही आम्हाला नेता नको मंत्री हवा, तोही नागरिकांच्या भल्याचा हवा, असे म्हणत बाळा भेगडे यांच्या बाजूनेचं कौल दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!